PlacesTravel BlogTrending

महाराष्ट्रातील सर्वात उंच १० शिखरे 10 highest peaks in Maharashtra

महाराष्ट्र राज्य हे भारतातील एक महत्वाचे अणि आकर्षक राज्य आहे.महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीला ८४० किलोमीटर इतक्या लांबीची डोंगररांग लाभलेली आहे.\

हे पण वाचा

Pachmarhi Hill Station : पचमढी हिल स्टेशनचा प्रवास आणि इतर माहिती

ह्या डोंगररांगेमुळे आपले महाराष्ट् राज्य निसर्ग परंपरेने नटलेले आपणास दिसून येते.

आजच्या लेखात आपण महाराष्ट् राज्यातील सर्वात उंच शिखर कोणकोणते आहेत हे थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

Vijaydurg Fort : महाराष्ट्रातील विजयदुर्ग किल्ल्याबद्दल तुम्हाला किती माहिती आहे vijaydurg fort information

कळसुबाई –

कळसुबाई हे महाराष्ट्रातील उंच शिखरांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेले शिखर आहे.हे महाराष्ट् राज्यातील सर्वात उंच शिखर आहे.

ह्या शिखरावर आपल्याला कळसुबाई देवीचे मंदिर देखील दिसुन येते.कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात आहे.

कळसुबाई हे शिखर नाशिक इगतपुरी महामार्गावर असलेल्या घोटी ह्या गावाच्या जवळ असलेल्या बारे गावात आहे.हया गावात कोळी महादेव समाजातील लोकांचे वास्तव्य आहे.

ह्या गावातुनच कळसुबाई शिखरावर जाण्याचा मार्ग देखील आहे.

हे शिखर महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट म्हणून देखील ओळखले जाते.हया शिखराची समुद्र सपाटीपासुनची उंची ५४०० फुट म्हणजे १६४६ मीटर इतकी आहे.

कळसुबाई हे शिखर फक्त महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.

तारामती शिखर –

तारामती शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहे.हे शिखर महाराष्ट् राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात आहे.

हरिश्चंद्रगडावर असलेल्या दोन शिखरांपैकी तारामती हे एक शिखर आहे.हे शिखर महाराष्ट् राज्यातील माळशेज पर्वतरांगेत वसलेले आहे.

तारामती शिखर समुद्रसपाटीपासून १४३१ मीटर इतक्या उंचीवर स्थित आहे.

तोरणा किल्ला –

तोरणा किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले होते म्हणून ह्या किल्ल्याला तोरणा असे ठेवण्यात आले होते.

तोरणा हा किल्ला प्रचंडगड ह्या नावाने देखील ओळखला जातो.तोरणा किल्ला समुद्र सपाटीपासुन जवळपास १४०४ मीटर इतक्या उंचीवर स्थित आहे.

तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगा मध्ये वसलेला आहे.महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांच्या तोरणा किल्ल्याचा दहावा क्रमांक लागतो.

सप्तश्रृंगी गड –

सप्तश्रृंगी गड हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांपैकी एक महत्वाचे शिखर आहे.हे महाराष्ट् राज्यातील नाशिक जिल्ह्यातील वणी ह्या गावाजवळ आहे.

हे शिखर सप्तश्रृंगी देवीचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून देखील ओळखले जाते.महाराष्टात असलेल्या देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी हे अर्धे पीठ आहे.ह्या शिखराची उंची जवळपास १४१६ मीटर इतकी आहे.

दरवर्षी महाराष्ट्र राज्यातील लाखो भाविक ह्या ठिकाणी दर्शनासाठी येतात.हे शिखर सातमाळा डोंगररांगेत विस्तारलेले शिखर आहे.

सप्तश्रृंगी गड हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांच्या यादीत नवव्या क्रमांकावर येते.

हरिश्चंद्रगड –

हरिश्चंद्रगड शिखर महाराष्ट् राज्यातील सर्वात उंच शिखरांच्या यादीत आठव्या क्रमांकावर येते.हे शिखर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात आहे.

सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्यावर बसलेला हा किल्ला अनेक ट्रेकर्सला आपल्याकडे आकर्षित करून घेतो.हरिश्चंद्रगड हा समुद्रसपाटीपासून सुमारे १४२४ मीटर इतक्या उंचीवर स्थित आहे.

महाबळेश्वर –

महाबळेश्वर हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांपैकी एक महत्वाचे शिखर आहे.महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांच्या यादीत हे सहाव्या क्रमांकावर आहे.

महाबळेश्वर हे आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात प्रसिद्ध असे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.इथे असलेल्या थंड वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी उन्हाळ्यात अनेक पर्यटक ह्या ठिकाणाला भेट देतात.

महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट् राज्यातील सातारा जिल्ह्यात आहे.हे शिखर समुद्रसपाटीपासून सुमारे १४३८ मीटर इतक्या उंचीवर स्थित आहे.

धोडप –

धोडप हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.धोडप हे शिखर महाराष्ट् राज्यातील नाशिक जिल्ह्यात आहे.धोडप हे शिखर सातमाळा डोंगररांगेत वसलेले आहे.

हे नाशिक मधील दुसरे सर्वांत मोठे शिखर म्हणून ओळखले जाते.धोडप ह्या शिखराची समुद्र सपाटीपासुनची उंची १४७२ मीटर इतकी आहे.

घनचक्कर –

घनचक्कर हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.हे शिखर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात माळशेज पर्वतरांगेत वसलेले आहे.

घनचक्कर हे शिखर समुद्रसपाटीपासून सुमारे ४९३२ फुट १५१० मीटर इतक्या उंचीवर स्थित आहे.

गवळदेव –

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर मध्ये हे तिसरया क्रमांकावर असलेले शिखर आहे.गवळदेव हे शिखर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात आहे.

ह्या शिखराच्या पायथ्याशी कोलतेंबा शिरपुंजा कुमशेत इत्यादी गावे असल्याचे आपणास दिसून येते.गवळदेव ह्या शिखराची समुद्र सपाटीपासुनची उंची जवळपास १५२२ फुट इतकी आहे.

साल्हेर –

साल्हेर किल्ला महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांच्या यादीत दितीय क्रमांकावर असलेले शिखर आहे.

साल्हेर किल्ला सह्याद्री पर्वत रांगेत वसलेला सर्वात उंच किल्ला म्हणून ओळखला जातो.हा किल्ला महाराष्ट् राज्यातील नाशिक जिल्ह्यात आहे.ह्या किल्ल्याच्या पायथ्याशी वाघांबे अणि साल्हेर वाडी नावाची गावे आहेत.

साल्हेर हा शिखर समुद्रसपाटीपासून सुमारे १५६७ मीटर इतक्या उंचीवर स्थित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button