लोहगड किल्ला प्राथमिक माहिती (Information about Lohagad fort)
Lohagad fort: महाराष्ट्र संस्कृती ही अगदी साता समुद्रापार पोहोचलेली आहे. महाराष्ट्र हा सांस्कृतीक, सामाजिक, राजकीय, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेले राज्य. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचे अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण आपल्याला सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अनेक डोंगररांगा आणि गडकोटांच्या माध्यमातून होत असते.
गडकोट ही स्वराज्याची संपत्ती होय. गडकोटांच्या ऐतिहासिक माहितीच्या या लेखमालेमध्ये आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहोत. आजच्या भागामध्ये आपण लोहगड या महत्त्वपूर्ण किल्ल्याबद्दल माहिती बघणार आहोत… Lohagad fort
लोहगड किल्ला प्राथमिक माहिती (Primary information of fort Lohagad)
मित्रांनो 3400 फूट उंचीवरील लोणावळा या पुणे जिल्ह्यातील गावाच्या मावळ प्रांतात लोहगड हा किल्ला वसलेला आहे. हा किल्ला इंद्रायणी आणि पावनखोरे अशा दोन भागांमध्ये विस्तारलेला असून विसापूर किल्ल्याला जोडण्यात आलेला आहे. हा किल्ला पुष्कळ वर्ष मराठा साम्राज्यात स्वराज्याची सेवा करत होता. स्वराज्याचे आद्य असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी बराच काळ या किल्ल्याला आपल्या ताब्यात ठेवलेले आहे. पुण्यापासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर असलेला लोहगड हा मावळ डोंगर रांगेत वसलेला असून हा एक गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. या किल्ल्याच्या मालकी बद्दल बोलायचे झाल्यास पाच वर्षांपर्यंत या किल्ल्यावर मिगल वंशाचे राज्य होते. मात्र हा किल्ला स्वराज्यातच सर्वाधिक काळ राहिलेला आहे. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुरंदराच्या तहा अंतर्गत 23 किल्ले औरंगजेबाला दिले होते त्या मध्ये लोहगडाचा देखील समावेश होता. आणि फक्त याच कारणास्तव पाच वर्षापर्यंत मुघलांनी लोहगडावर आपली पताका फडकवली. मात्र अवघ्या काहीच कालावधीत इसवी सन १६७० मध्ये छत्रपती शिवरायांनी हा किल्ला पुन्हा एकदा स्वराज्यात सामील करून घेतला. Lohagad fort
असे म्हटले जाते की लोहगडाची निर्मिती सुरजमल या राजाने केलेली आहे. छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीत शिवराय या किल्ल्यावर आपली संपत्ती ठेवत असत, असे स्थानिक गाईड सांगतात. हा किल्ला सर्वोत्तम डोंगरी किल्ल्यांतील एक किल्ला आहे.
लोहगड किल्ल्याची ऐतिहासिक महती (Historical importance of fort Lohagad)
काही दस्तऐवजांच्या आधारे असे प्रतीत होते की, हा किल्ला सुमारे 700 वर्षांपूर्वी सुरजमल या राजाद्वारे बांधण्यात आलेला आहे. या किल्ल्यावर सातवाहन, यादव, चालुक्य, राष्ट्रकूट इत्यादी वंशांनी राज्य केलेले आहे. जेव्हा इसवी सन 1489 मध्ये मलिक अहमद द्वारे निजामशाहीची सुरुवात झाली त्यावेळी त्यांनी जिंकून घेतलेल्या बऱ्याचशा किल्ल्यांमध्ये लोहगडाचा ही समावेश होता. मात्र स्वराज्य स्थापनेनंतर छत्रपतींनी 1657 मध्ये विसापूर किल्ल्यासह लोहगड ताब्यात घेतला. आणि लोहगडावर स्वराज्याची पताका फडकू लागली. Lohagad fort
मात्र मोगलांसह लढाई होत असताना आपल्या सैन्याचा विचार करून छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह करण्याचे ठरविले. या तहामध्ये पुरंदर किल्ल्यासह इतर 23 किल्ले मुलांना देण्याचे ठरले. यामध्ये लोहगड या किल्ल्याचा देखील समावेश होता.
तहाच्या अंतर्गत मोगलांकडे गेल्यानंतर मोघलांनी लोहगडावर केवळ पाचच वर्षे राज्य केले. आणि 13 मे 1670 मध्ये मराठ्यांनी पुन्हा लोहगडाला स्वराज्यात खेचून आणले. पुढे छत्रपतींच्या निधनानंतर हा किल्ला शाहू महाराजांच्या ताब्यात होता. जो त्यांनी 1713 मध्ये कान्होजी आंग्रे यांच्याकडे सोपविला. आणि पुढे हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
लोहगड किल्ल्याच्या दरवाजांविषयी (About doors of fort Lohagad)
मित्रांनो लोहगड वर जाण्यासाठी चार दरवाजे असून त्यांना महादरवाजा, गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा, आणि नारायण दरवाजा म्हणून ओळखले जाते.
लोहगडाचा मुख्य दरवाजा म्हणून महादरवाजाला ओळखले जाते. हनुमानाच्या मूर्तीचे सुंदर नक्षीकाम असणारा हा दरवाजा नाना फडविण्यासाठी बनविला/जीर्णोद्धारीत केला आहे असे सांगण्यात येते.
लोहगडाचा प्रथम दरवाजा म्हणून ओळखला जाणारा, गणेश दरवाजा हा एक मध्यम आकाराचा दरवाजा असून, ह्या दरवाजाचा किल्ल्याच्या आत जाण्यासाठी वापर केला जात असे. या दरवाजाच्या आतील भागात दोन देवड्या बनविण्यात आलेल्या आहेत. असे सांगितले जाते की या दरवाजाच्या दोन्ही बाजूच्या बुरुजांच्या खाली सावळे कुटुंबीय यांचा नरबळी देण्यात आला होता.
गडावर येण्यासाठी हनुमान दरवाजा नावाचा एक प्राचीन दरवाजा देखील होता. सोबतच गडावर नारायण दरवाजा देखील असून, हा दरवाजा देखील किल्ल्यामध्ये थेट प्रवेश करण्यासाठी वापरण्यात येत असे. या दरवाजाचे देखील जीर्णोद्धार कार्य नाना फडणवीस यांनी इसवी सन 1789 मध्ये करून घेतले होते असे सांगण्यात येते. या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या जवळ धान्य ठेवण्यासाठी एक भुयार बनविण्यात आले होते.
लोहगड किल्ल्यावरील प्रेक्षणीय स्थळे (View points on fort Lohagad)
मित्रांनो कुठलाही किल्ला बघत असताना तो किल्ला त्यातील काही विशिष्ट वास्तू अथवा ठिकाणांवरून आपल्या नेहमीसाठी स्मरणात राहतो. लोहगडावर देखील असे अनेक विविध ठिकाणे आहेत. ज्याची माहिती लोहगड बघण्यापूर्वी आपल्याला असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
किल्ल्यावर महादरवाजाच्या आत एक दर्गा असून दर्ग्यापासून पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला एक शांत आणि प्रसन्न शिवमंदिर बघावयास मिळते.
किल्ल्यावर रक्षणार्थ तोफांची व्यवस्था करण्यात आली होती. आज आपल्याला गणेश दरवाजाच्या आतील बाजूस मोकळ्या जागी या तोफा बघावयास मिळतात. मात्र आज मितीस या तोफा मोडकळीस आलेल्या आहेत.
किल्ल्यावर लक्ष्मी कोटी म्हणून एक ठिकाण असून, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेची लूट केल्यानंतर लुटलेली सर्वच संपत्ती या लक्ष्मी कोटीमध्ये ठेवण्यात आली होती. ही कोटी आज देखील आपण गडावर बघू शकतो.
गडावर अगदी टोकावर एक कडा असून त्याचा आकार विंचवासारखा आहे. म्हणूनच या कड्याला विंचू कडा असे नाव पडले आहे.
हा किल्ला प्राचीन असल्याने या किल्ल्यावर एक गुहा देखील बघावयास मिळते. या गुहेमध्ये तब्बल 80 ते 100 लोक एकाच वेळी बसू शकतात.
किल्ल्यावर पाणी पिण्याच्या व्यवस्थेसाठी एक तलाव बनवण्यात आला होता. त्याला सोळा कोणी तलाव असे म्हटले जाते.
लोहगडाचा पर्यटनाला कसे जावे? (How to reach fort Logahad)
मित्रांनो, लोहगड किल्ला बघण्यासाठी आपण रेल्वे, विमान, बस किंवा खाजगी वाहन इत्यादी कुठल्याही मार्गे जाऊ शकता. आपण लोहगडापासून खूपच दूर असाल तर पुण्याच्या लोहगाव विमानतळावर उतरून, बस अथवा टॅक्सीद्वारे लोहगड किल्यावर जाऊ शकता. तसेच रेल्वे मार्गाने येत असाल तर लोणावळा रेल्वे स्टेशन पर्यंत रेल्वेने येऊन तिथून बस, टॅक्सी किंवा लोकल रेल्वे मार्फत आपण लोहगडापर्यंत पोहोचू शकता. मात्र इथे लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे थेट लोहगडापर्यंत कुठलीही लोकल रेल्वे अथवा बस जात नाही. त्यामुळे शेवटी तुम्हाला रिक्षा अथवा टॅक्सीने जाणे भाग पडेल. आपण खाजगी वाहनांनी जात असाल तर सर्वप्रथम लोणावळ्यामध्ये पोहोचून आपण तेथून अगदी काही वेळातच लोहगडावर पोहोचू शकता.
मित्रांनो लोहगड हा पर्यटकांसाठी मोफत बघता येतो. मात्र हा किल्ला आपण केवळ सकाळी नऊ पासून संध्याकाळी सहा पर्यंतच बघू शकता. त्यामुळे निघण्यापूर्वी वेळेचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे ठरते.
तर मित्रांनो आजची ही लोहगड किल्ल्याविषयी माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आपण आपले अभिप्राय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. तसेच आपण लोहगडाजवळ राहत असाल किंवा लोहगडाच्या पर्यटनाला गेलेले असाल तर अजूनही आपल्या जवळील माहिती आपण कमेंटच्या माध्यमातून आम्हा पर्यंत पोहोचवू शकता. उचित माहितीला नक्कीच प्रसिद्धी दिली जाईल. तसेच ही मौल्यवान माहिती आपल्या गडप्रेमी मित्र-मैत्रिणींना नक्कीच पाठवा.