प्रवास दिल्ली ते तामिळनाडू – संघर्ष जाधव (१/३)
तसा तामिळनाडूला जायचा काही प्लॅन नव्हता, पण माझ्या जवळच्या मैत्रिणीचं मी तर मैत्रिणीपेक्षा मोठी बहीण म्हणेन तीच लग्न ठरलं. आता लग्न होत ते ठिकाण आहे मी राहतो तिथून अंदाजे ३००० किमी दूर पण मी तिला शब्द दिला होता तुझ्या लग्नाला मी येणार कोणत्याही परिस्थितीत आणि मी गेलोच.
तर जानेवारीच्या मध्यात तिचा मला फोन आला “संघर्ष माझं ८ फेब्रुवारीला लग्न आहे” आणि तिथून माझी तयारी सुरु झाली तामिळनाडू ला जायची. आता ३००० किमी जायचं म्हणजे विमानानेच जावं लागणार होत. मग लगेच तिकीट बुक करून टाकलं.
( स्वस्तातच मिळालं मला ) आता इतक्या दूर विमानप्रवासावर खर्च करून जायचंय, तर म्हंटल फिरून पण घ्यावं तिकडे आणि मग कोणत्या एअरपोर्ट ला जायचं आणि कसा प्रवास करायचा याच प्लांनिंग सुरु केले आणि त्यासोबतच सोबत कोणी मित्र येतोय का याचा शोध घेऊ लागलो दोघांना तयार केले एक होती मुंबईची तिने कॅन्सल केलं आणि दुसरा होता बंगलोर मध्ये तो आला. ५ आणि ६ फेब्रुवारी ला मदुराई आणि रामेश्वरम् फिरायचा प्लॅन झाला ७ ला मित्र ल रिटर्न बंगलोर लाजाणार आणि मी नागरकोईलला असं ठरलं.
५ तारखेला मी दिल्लीवरून(१-२ फोटो) सकाळी मदुराईसाठी निघालो दुपारी १ वाजता मी मदुराई मधे पोहोचलो.(३)
आम्ही सेल्फ ड्राईव्ह कार बुक(५) केली होती फिरण्यासाठी, ती मी पिक करायला एअरपोर्ट वरून डायरेक्ट गेलो. शिवम सकाळीच ट्रेनने आला होता. जर तुम्ही मदुराई एअरपोर्ट ला कधी जाणार असाल तर कॅबवाले मदुराई साठी २००-३०० रुपये घेतात, जर तुमच्यकडे जास्त सामान नसेल तर २ किमी वरून मदुराई सिटी साठी बस मिळतात तिकीट फक्त १३ रुपये आहे आणि डायरेक्ट एअरपोर्ट बसेस पण आहेत.
मी कार घेऊन शिवम ला पिक केले आणि जेवायला आम्ही मदुराईच्या अम्मा मेस मध्ये गेलो शिवम शाकाहारी आहे हे माझ्या लक्षात नव्हतं आणि हि अम्मा मेस मांसाहारासाठी प्रसिद्ध तरी पण त्याने मग शाकाहारी थाळी घेतली मी मटण मसाला आणि भात घेतला. जेवण मस्त एकदम केळीच्या पानावर वाढण्यात आले तिथे बरेच वेगवेगळे प्रकारचे पदार्थ होते, पण दोघे असल्यामुळे सर्व try नाही करता आले . जर तुम्ही प्लॅन केलात तर नक्की अम्मा मेस मध्ये जेवण करा खूप छान taste आहे. पोटपूजा झाल्यानंतर मीनाक्षीअम्मा मंदिर मध्ये जायचा प्लॅन होता आणि आम्ही त्या दिशेने गेलो सुद्धा पण सध्या मदुराई हे स्मार्ट सिटी मधे असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्ता रुंदीकरणाची कामे चालू होती आणि मंदिर हे आतमध्ये असल्यामुळे गाडी पार्किंग ची पंचायत झाली. त्यात छोटे रस्ते आणि भाड्याने घेतलेली गाडी तिला इजा होण्याची काळजी वेगळीच.
शेवटी मंदिरात न जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा संध्याकाळचे ४:३० वाजले होते. त्या छोट्या छोट्या रस्तामधून बाहेर पडून आम्ही मदुराई प्रसिद्ध जिगरठंडा पिण्यासाठी निघालो. खूप ऐकलं होते आणि one of the recommended drink आहे ते मदुराईचं आणि खरंच खूप मस्त असं ते पेय आहे, जे तुम्हाला एकदम थंड करून टाकेल.(४) ते बासुंदी, सब्जा आणि ice creame चे मिश्रण असते पण टेस्ट unique असते बरं!
संध्याकाळचे ५:३० झाले होते आणि मी मदुराई मधे काहीच पाहिलं नव्हतं फक्त रोड ने फिरत होतो गाडी घेऊन प्लाननुसार मदुराई फिरणं नाही झालं त्या दिवशी माझं. शेवटी रामेश्वरम साठी प्रवास सुरु केला आणि हळू हळू ६० ते ८० प्रति तास या वेगाने रामेश्वरम च्या दिशेने निघालो. रस्ता एक नंबर आहे मदुराई ते रामेश्वरम १८० किमी आहे आणि त्यात ८० किमी रस्ता हा चौपदरी आहे तर बाकीचा हा दोन पदरी आहे. रामेश्वरम च्या ५० किमी आधी जेवणासाठी आम्ही हॉटेल वसंतम(रामनाथपुरम जवळ) मधे थांबलो तिथे मसाला डोसा आणि परोठा मिक्स व्हेज सोबत खाल्ला मस्त होत हॉटेल जरूर try करा.(६)आम्ही राहायला हॉटेल वैगेरे काही बुक नव्हते केले फक्त एक हॉटेल बघून ठेवलं होते. आम्ही हॉटेल वसंतम मधून साधारणतः १० च्या दरम्यान निघालो आणि १०:३० वाजता आम्ही फेमस पाम्बन पुलावरून रामेश्वरम बेटावर गेलो. रात्री ११:३० वाजता आम्ही रामेश्वरम मधे आरामात पोहचलो आणि जे हॉटेल पाहिले होते तिथली पार्किंग ची व्यवस्था पाहून हॉटेल बुक केले आणि फ्रेश होऊन झोपी गेलो. (७)
क्रमशः(१/३)