प्रवास दिल्ली ते तामिळनाडू – संघर्ष जाधव (2/३)
दि . ६ फेब्रुवारीला सकाळी लवकर उठून रामेश्वरम फिरायचं आणि ११ च्या सुमारास धनुष्कोडी कडे जायचा प्लॅन होता. सकाळी आम्ही ७ च्या दरम्यान उठलो, फ्रेश होऊन नाश्ता करायला आणि रामनाथस्वामी मंदिर बघायला बाहेर पडलो. रूम पण अशाच ठिकाणी केली होती कि तिथून मंदिर जवळ असेल, मंदिर १० min (चालत)इतक्या अंतरावर होते. मंदिरामध्ये जायच्या आधी भाविक अग्नितीर्थम(१-२) या ठिकाणी स्नान करून मंदिरामध्ये जातात, तेथून आम्ही पास झालो.
मंदिर ४ हिंदू तीर्थस्थळांपैकी एक असल्यामुळे गर्दी तर होतीच, पण ते मंदिराचं बांधकाम, त्याचा आवार, कलाकुसरत आणि मुख्यतः त्याचा corridor पाहून मी थक्क झालो. मंदिर खूप मोठं आहे आतमध्ये आणि प्रत्येक कोपरा हा unique आहे. मंदिर एक भारतीय स्थापत्य शैलीचा एक नमुनाच आहे.(३) मंदिर पूर्णपणे पाहायला आम्ही १ तास लावला आणि निघालो परत हॉटेल रूम कडे जाता जाता वाटेत नाश्ता केला, तामिळनाडू ऑथेंटिक इडली-डोसा,आणि पोंगल(४).
आम्ही गेलो होतो तो महिना होता फेब्रुवारी त्यामुळे सकाळच्या १० वाजताच गरम व्हायला सुरुवात झाली होती. या गरमीमुळे रूमवर फ्रेश होऊन धनुषकोडीच्या दिशेने ११ वाजता निघालो.
धनुष्कोडी ला जायची एक वेगळीच excitement होती, आतापर्यंत व्हिडिओस मधुन पाहिलेले भारतातील एक सुंदर ठिकाण, जेथून Srilanka काही किमी अंतरावर आहे आणि पहिल्यांदा बंगालचा उपसागर बघण्याची उतावीळ एक वेगळीच होती. कार जस जशी मी धनुष्कोडी कडे चालवू लागलो, तस तशी ती उत्सुकता वाढतच गेली. एक १०-१२ किमी गाडी चालवल्यानंतर रोडच्या दोन्ही बाजूने पाणी दिसू लागले आणि त्याच्या मधून मी एक स्वप्नात असल्याप्रमाणे कार चालवत, गाणी ऐकत, नजाऱ्याचा आस्वाद घेत गाडी चालवत होतो. थोड्याच वेळात धनुषकोडी गावाला आम्ही जाऊन पोचलो, जे १९६४ च्या वादळामध्ये उद्ध्वस्त झालेलं. (तिथे कोणी आता राहत नाही.) तिथे पूर्वी असलेलं रेल्वे स्टेशन, चर्च चे अवशेष गाडीतून पाहूनच पुढे शेवटच्या टोकाला गेलो. आणि जे एक bucket list मधली माझी गोष्ट पूर्ण झाली, भारताचं शेवटचं टोक, तिन्ही बाजूने पाणी आणि ड्रायविंग सीट वर मी. एक अविस्मरणीय क्षण.
गाडी पार्क केली आणि अथांग असा समुद्राकडे काही वेळ निवांत पाहत राहिलो(५). तो तिथला अनुभव शब्दात व्यक्त करता येणारच नाही. खूप सारे फोटोस व्हिडिओस काढले आणि बीच वर उतरलो. आयुष्यात पहिल्यांदा बंगालच्या उपसागराच्या पाण्याला स्पर्श केला(६), कारण याच्या आधी फक्त आणि फक्त अरबी समुद्र पाहिला होता. खूप लोक होती तिथे काही भाविक होते, जे थोडी सी sightseeing करण्यासाठी आले होते, तर काही आमच्यासारखे भटकायला आले होते. १-२ तास वेळ घालवल्यानंतर परतीचा प्रवास सुरु केला आणि धनुषकोडी गावामध्ये थांबलो तिथे चर्च(७-८) जवळ जाऊन फोटोस घेतले.
एव्हाना दुपारचे १ वाजले होते जेवण तिथेच करायचा विचार होता पण समुद्रकिनारी आपण शाकाहारी जेवण कसं काय अपेक्षित करू शकतो? शेवटी नाहीच मिळाले. नारळ पाणी प्यायलो व रामेश्वरम कडे रवाना झालो.
पुन्हा रामेश्वरम मध्ये पोचल्यावर माजी राष्ट्रपती Dr. A .P .J अब्दुल कलाम यांच्या घराला भेट दिली(९), तिथे संग्रहालय आहे.
दुपारच्या गर्मीमुळे थोडे थकलो होतो, त्यामुळे फ्रेश होऊन जेवायचं विचार केला आणि व्हायचा तोच गोंधळ झाला, फ्रेश होऊन जेव्हा बाहेर पडलो जेवायला त्यावेळेस ३ वाजले होते आणि तिथे सर्वच हॉटेल ३ वाजता बंद होतात. जेवण मिळालेच नाही मग चहा बिस्कीट वरच समाधान मानलं. संध्याकाळी परत मधुराई ला जायचा प्लॅन असल्यामुळे तासभर रूमवर विश्रांती घेतली.
संध्याकाळी ५:३० वाजता checkout केलं आणि पाम्बम पुलावरून सूर्यास्ताला विटनेस करायला गेलो. गाडी बाजूला लावून खाली उतरलो आणि जो काही नजारा पाहिला त्यातच मी जे काही पैशे तिथपर्यंत पोचायला खर्च केले ते वसूल झाले याची शाश्वती आली. काय तो नजारा पुलाच्या पश्चिमेकडे एक छोटस गाव आणि त्याला असलेलं बंदर, सूर्याची मावळतीची तपकिरी किरणे आणि पुलावरून वाहणारा वारा तर पूर्वेकडे १०० वर्ष जुना ब्रिटिशकालीन रेल्वे चा पूल. पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे मध्य भागी तो एका गेट सारखा आहे(१०). जर का जहाज तिथून जाणार असेल तर तो खोलला जातो . त्या पुलावरून रेल्वेमधून प्रवास करणे, हि एक वेगळीच अनुभूती आहे, पण या महामारीमुळे मला नाही katatavआला. संध्याकाळचे ७ वाजले होते, सूर्यास्त झाला होता.तसा मग आम्ही मोर्चा मदुराई कडे वळवला आणि हळू हळू मस्त रोड आणि गाणी एंजॉय करत रात्री १२ वाजता मदुराई मध्ये पोचलो. रूम केली आणि आराम केला .
(२/३)