Travel Blog

आमचा प्रवास.. किल्ले रायगड !

पावसाळा सुरू होऊन एक महिना झालेला आम्ही आधीच ठरवल्याप्रमाणे आमच्या जुलै महिन्याच्या प्रवासाचे प्लॅनिंग करायला सुरुवात केली आम्ही हि ट्रिप महिन्याच्या शेवटीला करणार होतो त्यासाठी मी ११/१२ तारखेलाच तिकीट बुक केले आणि आम्हाला साधारण १५ तारखेला कळाले की रायगड जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट आहे ! मग काय ट्रीप कॅन्सल ?? होते की काय असं वाटायला लागलं. आम्ही वडोदरा वरून २१ तारखेला निघणार होतो जाण्याचा २ दिवस अगोदर थोडी चौकशी केल्यावर कळलं की पाऊस कमी झालाय आता आनंद फार मोठा कारण कॉलेजच्या नंतर सात वर्षांनी मी रायगडला पुन्हा भेट देणार होतो.

रायगड जिल्ह्यातला एक सुंदर नजारा

मी तसा परभणी जिल्ह्यातला पण शिक्षणामुळे मला नेहमी माझं गाव सोडून बाहेर राहावं लागलेलं. माझं इंजिनीरिंगच शिक्षण रायगड जिल्ह्यामध्ये झालेलं. हॉस्टेल मध्ये असताना आम्ही मित्रमंडळ सुट्टीचा दिवशी कॉलेज चा मागचा बाजूला असलेल्या डोंगरावर ट्रेकिंग साठी जात. हळू हळू मला हा भाग फारच आवडायला लागला कोकणातला तो पाऊस, ती डोंगर-झाडी, ती साधी भोळी माणसं मला फार आवडतात म्हणून मुद्दामून बायकोला कोकण आणि कोकणातील माणसं दाखवण्याच्या हेतूने हि ट्रिप प्लॅन केलेली. आमच्या या ट्रिप मध्ये माझ्यासोबत ऑफिसची मित्रही होती.

संध्याकाळचे मस्त जेवण करून आम्ही साधारण रात्री १०.३० वाजता स्टेशन वर आलो. रात्री ११ वाजताची आमची रेल्वे होती ती अली थेट १२ वाजता. आम्हाला वाटले आमची पुढची काँनेकटिंग असलेली M२M फेरी ची सफारी जाते पण आता परत एकदा नशीब आमचं ! रेल्वे ने आम्हाला वेळेवर सकाळी ५.३० वाजता दादर स्टेशन वर सोडले. आम्ही स्टेशन वरून फेरीपर्यंत येण्यासाठी कॅब बुक केली. कॅब मध्ये बसल्यावर थोड्यावेळातच पाऊस सुरू झाला. दाट काळ्या ढगांमुळे जोरदार पावसाची शक्यता दिसायला लागली. माझी ड्रीम सिटी मुंबई त्या कॅब मध्ये बसल्यावर सकाळच्या सहा वाजता मला खूप शांत वाटायला लागली. त्या उंच इमारती, छोटी-मोठी घरं, रस्त्यावर चालणारा प्रत्येक माणूस हे सर्व बघून मी भुतकाळात हरवत होतो. कॉलेज झाल्यावर माझा पहिला जॉब मुंबईतूनच सुरु झालेला. साधारण पाऊण तासात आम्ही भाऊचा धक्का या ठिकाणी पोहोचलो. M२M फेरी मध्ये हा आमचा पहिला प्रवास असणार होता. फेरी सुरू व्हायला वेळ होता म्हणून तिथले सुंदर क्षण मोबाईलच्या कॅमेरात टिपायला सुरुवात केली.

M2M फेरी

पंधरा मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर नंतर आमची M2M फेरी आम्हाला अलिबाग पर्यंत घेऊन जायला तयार होती. आम्ही फार कुतूहलाने आणि आत प्रवेश केला. फेरीच्या आत गेल्यावर जणू एखाद्या ५ स्टार हॉटेल प्रमाणे त्या जहाजाचा पहिला व दुसरा मजला टापटीप वाटत होता. ग्राउंड फ्लोर हा गाड्यांसाठी ठरलेला होता. आम्ही पहिल्या मजल्यावर एका ठिकाणी आमच्या बॅग ठेवल्या आणि लगेच बाहेर म्हणजे जहाजेच्या गॅलरीत आलो त्या ठिकाणावरून दिसणारा अथांग समुद्र आम्ही आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला. थोडावेळ फोटो आणि व्हिडिओ काढून झाल्यावर आम्ही जहाजच्या समोरच्या बाजूला गेलो त्या ठिकाणावरून समुद्राच्या पाण्याला मागे टाकत आमची जहाज पुढे हे जात होती. त्या जागेवरून मुंबईचा किनारा खूप छान दिसत होता. ज्यावेळेस आपण समुद्राला दुरून शांत बसून बघतो त्यावेळेस खरच खूप शांत असं वाटतं. असाच पूर्ण सफरीचा आनंद घेत आम्ही आलीबाग पर्यंत कधी पोहोचलो हे कळालेच नाही.

उतरल्यावर आम्ही अलिबागच्या बीचवर जायचे ठरवले. मॅक्झीमा गाडी बुक केली आणि बीच वर आलो. सकाळची वेळ साडे आठ वाजलेले बीच बाजूला असलेली सर्व शॉप्स बंद होते. आम्हाला थोडी भूक लागली होती पण आम्ही थोडा वेळ वाट बघितली एक दुकान उघडले मग त्या शॉप मध्ये जाऊन छान नाश्ता केला. नंतर आम्ही अलिबाग बीच चा आनंद घेतला तिथले राईडस खेळलो. सकाळच्या वेळेला बीच वर गर्दी नसते आणि समुद्रालाही भरती आलेली असते त्यामुळे बीचवर शांत बसने मला खूप आवडते.

काही वेळ बीच वर घालवूंन तिथून आम्ही बस स्टॉप वर गेलो. म्हाडाची बस पकडली आणि बस मधले आम्ही शेवटचे पॅसेंजर असल्यामुळे आम्हाला बस मध्ये शेवटचे सीट मिळाले महाड पर्यंत जातानाचा रस्ता किती खराब आहे याचा आम्हाला चांगलाच अनुभव आला.

महाडमध्ये आम्ही कामात हॉटेल बुक केलं होतं. फायनली सोळा तासांच्या प्रवासानंतर आम्ही महाड मध्ये पोहोचलो. हॉटेल मध्ये पोहोचल्यावर फ्रेश होऊन आम्ही दिवसाचं पहिलं निवांत चांगलं जेवण घेतलं आणि रूम मध्ये जाऊन आराम केला. सकाळचा लवकर उठून रायगड ट्रेकिंगचा प्लान होता. प्रवासाचा थकवा आणि छान जेवण.. आम्ही झोपलो तर सकाळीच जाग आली.

मग काय पटपट आवरून आम्ही ट्रेकिंगसाठी रेडी झालो. गडावर पावसाळ्यात नेहमीच पाऊस असतो म्हणून रेनकोट, मोबाईलचे कव्हर सोबत घेतलं आणि बाकी काही सामान सोबत घेतले आणि सकाळच्या नाष्टासाठी खाली आलो सर्वांनी आपापल्याला आवडणारा नाश्ता मागवला. फावल्या वेळेत सहज हॉटेल्स रिसेप्शनिस्ट ला विचारले रायगड साठी बस किती वाजता असते तेव्हा कळाले बस आठ वाजता निघते, त्यावेळेला पावणे आठ वाजले होते. आमचा नाश्ता पण बाकीच होता मग प्रायव्हेट गाडीने जायचे ठरवले.

छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहूनच रायगडाला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. रायगड कडे जातानाचा प्रवास देखील सुंदर होता. हिरवीगार दाट झाडी त्यावर चढलेले हिरव्या रंगाचे वेल. मध्ये मध्ये फुलांचे मोठे झाड हे सर्व बघत छोट्या मोठ्या डोंगरांमधून आमची गाडी जात लागली. आम्ही गाडी मध्ये असतानाच प्लान केला की रायगड वर जाताना रोपवेनी जायचे आणि उतरतांना पायर्‍यांवरुन खाली येऊया. रोपेच्या तिकीट घराजवळ आमची गाडी येऊन थांबली. तिथून आम्ही तिकीट घेतले आणि लाईन मध्ये जाऊन उभा राहिलो. या ठिकाणावरून रायगडचे खूप छान दृश्य आम्हाला दिसत होते. रायगडाच्या माथ्या पासून एक नाही तर ७ ते ८ पडणारे धबधबे बघून डोळे तृप्त झाले. गडाचा वरचा भाग ढगांनी पूर्ण झाकला गेला होता. रोपवे साठी आमचा नंबर आला गेट उघडले आम्ही एक-एक करून ६ जण मध्ये बसलो. आम्ही सर्व जण पहिल्यांदाच रोपवे मध्ये बसणार होतो म्हणून थोडीफार भीती वाटत तर वाटत होतीच पण एक नवीन एक्सपिरीयन्स येणार होता हे माहिती होत. मध्ये बसल्यावर सर्वांनी आपापले कॅमेरे वर काढले कारण जे दृश्य या कॅमेऱ्यामध्ये कैद होणार होतं ते आम्हाला अविस्मरणीय असा आनंद देणारं होतं..

जस-जसे आम्ही वर जात होतो तसे तसे आम्ही धुक्यांच्या दाट ढगांमध्ये प्रवेश करत होतो. एक वेळ अशी होती की आम्हाला आमच्या समोर बसलेली आमची मित्र मंडळी पण दिसत नव्हती जणू आम्ही स्वर्गात प्रवेश घेत आहोत दहा सेकंदाच्या रोमांचक अनुभवा नंतर आम्ही रायगडाच्या मागच्या बाजूला असलेल्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. गडावर वर पाऊस सुरू होता म्हणून आम्ही सर्वांनी आमची रेनकोट घालून घेतली आणि निघालो आमच्या महाराजांच्या पुस्तकात वाचलेल्या आठवणी ताज्या करायला.

थोडे पुढे गेल्यावर आम्हाला तानाजी भेटला. हा तानाजी आमच्या रायगडाच्या ट्रिपचा आमचा गाईड होता. माझे मित्र गुजराती होते त्यांना महाराजांनी विषयी माहिती होती पण गड त्यांना फार नवीन होता. म्हणून आम्ही गाईड घेतला होता. तानाजीने आम्हाला गडावरील सर्व जागांविषयी माहिती सांगितली त्यात राणी महल, धान्यापेटी, महाराजांचा आश्रयस्थान, दरबार, पाण्याची टाकी, मुद्रा, बाजारपेठ, महाराजांची समाधी इत्यादी. थोडं पुढे जात असताना आम्हाला शांता काकी भेटल्या त्यांनी आम्हाला जेवण्यासाठी विचारले आम्हाला गड उतरण्यासाठी वेळ लागणार होता म्हणून आम्ही सर्वांनी होकार दिला गरम गरम भाकरी पिठलं कांदा लोणचे अशी ती प्लेट असणार होती. गडावर जाऊन थंडी पाऊस वारा हे सर्व अनुभव करून गरम-गरम जेवण करणे खरच खुप छान अनुभव असणार होता.

गडावर आजही बरेच घरी आहेत. जो-तो जमेल तसा उद्योग करून घर चालवत आहे. त्यांना बघून मनाला एक प्रश्न पडला यांना यांच्या दैनंदिन लागणाऱ्या सुविधा कश्या मिळत असतील जसेकी पाणी, भाजीपाला, पिठ इत्यादी कारण गडाला हजार-बाराशे पायऱ्या ! गड चढायला एक तास सहज लागतो आणि सामान घेऊन चढणे उतरणे आत्ताच्या काळात खरंच अवघड ! काकीना बोलल्यावर कळले कि पावसाळ्यामध्ये ती लोक झऱ्याचे पाणी पितात आणि आम्हालाही जेवण झाल्यावर तेच पाणी त्यांनी दिलं. काय फरक होता बिसलरीच्या पाण्यात आणि झऱ्याच्या पाण्यात? झाऱ्याच पाणी दिसायला तेवढे शुद्ध नाही दिसणार पण तो बिसलेरीच्या पाण्यापेक्षाही खूप छान गोड. पूर्वीच्या काळी तर पाणी आपली पूर्वज हेच तर पाणी पित असणार ..कोणी काढले हे आरो सिस्टम टीडीएस.

मला तर हे जाणवले जेवढे तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहणार तेवढे जास्त तंदुरुस्त राहणार आपल्या शहरांमध्ये तर माणूस पावसात भिजला कि शिंका द्यायला लागतो. ते आपले महाराज, मावळे आणि सर्व सैनिक कसे राहत असणार निसर्गाच्या विद्रुप रूपांमध्ये सुद्धा.

चला आमचे जेवण करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो धुके आणि वारा खूप असल्यामुळे आम्ही टकमक टोक यावेळा करणार नव्हतो महाराजांचे समाधी दर्शन होणे आम्हाला हवे होते.

आमचा परतीचा प्रवास करताना पाण्याने भरलेला तलाव बघितला गडावर पाण्याची काहीच कमी नव्हती महाराजांची दूरदृष्टी फार होती याची बरीच अनुभव आम्हाला आले गडावरील हत्तीची गोष्ट तुम्ही ऐकली असेलच. गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ म्हणजे नाना दरवाजाजवळ आलो खूप भव्य आणि दोन खिंडीमध्ये लपलेले हे द्वार त्यावेळी शत्रुसैन्याच्या तोफापासून खूप सुरक्षित असल्याचं समजलं आम्हाला गडावरून खाली यायला एक तास सहज लागला.

गडाच्या पायथ्याशी आल्यावर पुन्हा एकदा गडावर नजर टाकली आणि महाराजांचा निरोप घेतला खाली आलो तेव्हा संध्याकाळचे साडेपाच वाजले होते पाच वाजताची बस निघून गेली होती या वेळेला गाडी भेटणे शक्य वाटत नव्हते. विचारपूस केल्यावर कळले की साधारण दीड किलोमीटर असणाऱ्या समोरच्या गावात ऑटोरिक्षा किंवा बस नेहमीच असतात मग काय निघालो पाई-पाई गावाच्या दिशेने. थोडे पुढे गेल्यावर एक गाडी आमच्या मागून येऊन आमच्या जवळ थांबली ही गाडी एका कोल्हापूरच्या कुटुंबाची होती त्यांच्या गाडीमध्ये जागा असल्यामुळे त्यांनी आम्हाला त्यांच्या सोबत घेतले ते काकू सुद्धा महाडच्या रस्त्यानेच पुढे जाणार होते. आमचे नशीब होते ते आम्हाला भेटले आणि आमची फजिती नाही झाली. पावसाळा असल्यामुळे पाऊस ये-जा करत होता. त्यांनी आम्हाला हॉटेल जवळ सोडले आणि ते पुढे त्यांच्या प्रवासाला निघाले..

मित्रांनो कंमेंट मध्ये नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला आमचा प्रवास. येणाऱ्या पावसाळ्यात तुम्ही पण रायगडाला नक्की भेट द्या आणि आपल्या शिवरायांना नेहमी स्मरणात ठेवा.

जय शिवराय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button