जीवनात मार्ग दाखवणारा म्हणजे शिक्षक
५ सप्टेंबर ला जर वर्षी आपण शिक्षक दिन साजरा करतो..ज्यांनी आपल्याला घडवलेले त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करतो,त्याला आपण कॉल करून ,मॅसेज करून शुभेच्छा देतो आणि आपल्या मनात त्याच्यासाठी असलेले प्रेम आपण आपल्या शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो..ज्यांना व्यक्त होता येत नाही ते फक्त शिक्षक दिनाच्या हार्दीक शुभेच्छा सर तूम्हाला,असा नक्की मॅसेज करतात.
काही जण शिक्षकांना भेटवस्तू पण देतात,काही जण हार वगैरे घालून त्यांचा सत्कार करतात..प्रत्येकजण आपआपल्या शिक्षकाला या दिवशी चांगले वाटावे म्हणून काहींना काही करत असतात..पण आपण जरा सविस्तर जावू की शिक्षक म्हणजे फक्म शाळेतले शिक्षक असतात का,
शिक्षकाची व्याख्या आपल्याला अशी करता येईल की जो आपल्याला मार्ग दाखवतो आप आपल्या क्षेत्रात प्रगती कशी करता येईल या विषयी आपल्याला मार्गदर्शन करतो,आपल्याला प्रत्येक गोष्ट समजून सांगण्याचा प्रयत्न करतो,आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट तो समजून घेवून त्या प्रमाणे आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करतो,आपली परिस्थिती बघून आपल्याला आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न करतो ,तसेच आपण समाजात राहत असताना आपण कशा प्रकारे राहिले पाहिजे या बद्दल आपल्याला काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो ,अशा अनेक गोष्टी आपल्याला ज्या व्यक्ती कडून समजतात,आपण त्या शिकतो, ते सर्व व्यक्ती आपल्या शिक्षक आहेत..
मग सुरूवात आपण आपल्या आई वडीलापासून करू शकतो ,कारण त्यांनी आपल्याला न कळत प्रत्येक टप्पयावर काहींना काही शिकवले असते..आणि आजही त्यांच्या कडून बरेच शिकण्यासारखे असते.ते आपले हितचिंतक तर असतात पण आपली काळजी घेत असताना न कळत ते आपल्याला भरपूर गोष्टी शिकवून जातात.
आपल्या आजूबाजूचे आपले मित्र ,परिवारामधील इतर सदस्य आणि आपला समाज आपल्याला न कळत खूप काही शिकवत असतो,त्या प्रमाणे आपला विकास होतो..
ज्या ठिकाणी आपण आपल्या आयुष्यातील शिकण्याचे वर्ष घालवले असतात ते म्हणजे आपली शाळा आणि त्या शाळेतले शिक्षक..
काही शाळेतील शिक्षकांचे काम प्रामाणिक पणे करतात त्यात काहीही वाद नाही पण काही शिक्षक अमली पदार्थांचे सेवन करतात ,तंबाखू खातात,वेगवेगळया व्यसनी पदार्थांचे सेवन करतात आणि त्या अवतारामध्ये शाळेत शिकवायला विद्याथ्यासमोर जातात आणि त्यांना वेगवेगळे विषय शिकवतात..तो विषय ते चांगल्या पध्दतीने शिकवत असतील त्यात काय वाद नाही पण विद्यार्थी तूमच्या शिकवण्याकडेच फक्त लक्ष देत नसतो तो तूमच्या कडे सगळया बाजूंनी शिकण्याचा प्रयत्न करत असतो..आता अशे काही शिक्षक आहेत की तोंडामध्ये तंबाखू आणि वर्गामध्ये जाउन इतिहास ,इतर भाषा विषयाचे पुस्तक समोरच्या विदयार्थ्यासमोर वाचन करून दाखवतात तसेच शिकवतात..आता अशा विदयार्थ्यांचा विकास कसा होत असेल याचा थोडा विचार करा..
तंबाखू तोंडात आणि पिचकारी मारत जर एखादा शिक्षक विद्यार्थ्यासमोर येत असेल त्याचा कसा विकास होईल त्याला नैतिक शिस्त कशी लागेल…तो त्या विषयात चांगले मार्क मिळतील पण समाजामध्ये वावरत असताना आपली नैतिक जबाबदारी असते हे त्याला कोण शिकवणार..आपण आपल्या समाजात राहत असताना कशा प्रकारे राहायचे असते हे त्याला कोण शिकवणार जर शिक्षकच जर नैतिक जबाबदारी पाळत नसतील,किंवा आपली नैतिक जबाबदारीच शिक्षकाला समजली नसेल तर त्या विद्यार्थ्यांचा विकास कसा होणार..
आज स्पर्धा परीक्षेतू शिक्षक भरती करणारे व्यसनांच्या आहारी गेले आहेत पूढे चालून ते शिक्षक होतील आणि आपले मुले यांच्या कडे शिकायला जातील आणि मग आपल्या मुलावर काय परिणाम होईल त्यांचा विचार करा..
आज सरकारचा कायदा असेल नसेल पण सरकारने यात दखल घेउन शिक्षकांने व्यसन विद्यार्थ्यासमोर व्यसन कमीत कमीत न करता शिकवले पाहिजे यासाठी पाउले उचलून कडक कारवाई केली पाहिजे..आपल्या आसपासच्या शाळेतील सर्रास व्यसन करताना दिसत आहेत..त्याच्यावर लगाम लागला पाहिजे नाहीतर ..तसेच त्यांना नैतिक जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे..
आपली पूढची पिढी आपल्याला चांगली घडवायची असतील आपले आजबाजूचे शिक्षक आपल्याला आधी चांगले घडवावे लागतील..या साठी सरकारने तसेच आपण या बेवडया शिक्षकाच्या विरोध कारवाई केली पाहिजे किंवा कायदा आणला पाहिजे.