Trending

हाय वे केला पण त्याच्या वेगावर नियंत्रण कोण ठेवणार ?

दोन दिवसापूर्वी सहाच्या आसपास मला अविनाश चा कॉल आला ,त्याने सांगितले की मुंडेचा अपघात झाला आहे,हे ऐकून मी प्रसाद मुंडे ला कॉल आणि विचारपूस केली तर असे कळाले की पाठीमागून एकाने धडक दिली,माझ्या मित्राची काहीही चूक नसताना त्या दुसऱ्या व्यक्तीने अतिशय वेगाने येउन पाठीमागून धडकला..या अपघातामध्ये जीवीत हानी नाही झाली पण जर झाली असती तर याला जबाबदार कोण असते

माझ्या घराच्या समोर राष्ट्रीय महामार्ग गेला आहे ,त्या महामार्गावर महिन्यातून कमीत कमी दोन तरी अपघात होत असतात..अपघात झाल्यावर दवाखान्यातून रूग्णवाहिका येते पण रूग्णवाहिका जलद येण्यापेक्षा जर अशे अपघात न होण्यासाठी उपाय करणे गरजेचे आहे..

पहिली गोष्ट म्हणजे वेगाची मर्यादा घालून देणे गरजेचे आहे

कारण काही जण ४० किमी तासाला गाडी चालवतात तर काही जण ५०,काही ८० ,काही जण १०० च्या आसपास म्हणजे गाडीचा वेग किती असायला हवा, यावर काहीच नियंत्रण नाही..समजा काही जण ४० किमी तास या वेगाने गाडी चालवत आहे आणि अचानक पाठीमागून ९० च्या वेगाने गाडी आली ,अशा वेळेस त्या पाठीमागून येणाऱ्या गाडीच्या वेगावर नियंत्रण आणणे काही जणांना जमत नाही..आणि ते आपला समतोल बिघडून बसतात.

अशा वेळी अपघात होण्याचे जास्त शक्यता असते..एकाच वेगाने जर सगळे जण जात असतील तर अपघात कमी होतील..काही शहरामध्ये असा नियम आहे तो आपल्या येथे आता अमलात आणण्याची गरज आली आहे..

अपघात होतो म्हणजे त्या मध्ये कमवणारा व्यक्ती असेल त्या परिवारावर काय परिस्थिती येत असेल याचा विचार सरकारणे करणे गरजेचे आहे,

आजच्या अहवालानुसार नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या ताज्या आकडेवारीनुसार बेफाम वेगाने आणि निष्काळजीपणे वाहने चालविल्यामूळे सर्वाधिक अपघात होत असून ,अपघाताची हीच खरे कारण समोर आले आहे..आकडी वारीनुसार मागील वर्षभरामध्ये ८७०००च्या आसपास जणांचा बळी गेला आहे,निष्काळजीपणे वाहन चालविल्याने ४२००० च्या आसपास प्राण गमवावे लागले आहेत.

मद्यपान ,अमली पदार्थाचे सेवन या मुळे मृत्यू होण्याचे प्रमाण सुध्दा जास्त आहे..

बेफाम वेगात वाहन चालविल्या तमिळनाडू मध्ये ११००० च्या आसपास मृत्यू झाले आहेत

निष्काळजीपणे वाहन चालविल्यामूळे ११ हजार च्या आसपास उत्तर प्रदेश मध्ये मृत्यू झाले आहेत..

एखादया व्यक्तीचा अपघात होतो आणि त्या मध्ये तो मरण पावतो, यामुळे देशाचे आर्थिक नुकसान होते तसेच या घटनेमुळे परिवाराला मानसिक त्रास होतो..

मग अशाच घटना आपण होउ देणार आहोत का त्यावरील उपायावर काम कधी करणार

वेग नियत्रण करून वेगवेगळे मार्ग तयार करणे हे मोठया मोठया शहरामध्ये उपाय केले जातात मग आपल्या येथे त्याची अमलबजावणी कधी होणार

आणि जे मद्यपान करून ,कशाही प्रकारे वाहन चालवातात त्यांना दुसऱ्याच्या जीवनाशी खेळण्याचा कोणी अधिकार दिला

का नाही कठोर शासन याच्यावर उपाय करत ,आपले जीव एवढे कमी महत्वाचे आहेत का

का आपण यावरती सरकारला विचारत नाही

का आपल्याला चांगल्या सुविधा भेटत नाहीत

आणि लायसन काढताना पैसे देउन लायसन काढण्याची प्रता कधी बंद होणार

ज्या लोकांना थोडी फार गाडी जमली की ते लायसन काढायला जातात आणि काही पैसे भरून त्यांना लायसन सुध्दा दिले जाते .यावर कारवाई कधी होणार ..

देशाने गेल्या वर्षी एक लाख त्रेहात्तर हजार च्या आसपास प्राण गमावले आहेत..

याचे जीवन अप्रत्यक्षपणे आपण संपवले आहे..जर प्रत्येक गोष्टी वर जर नियत्रण असेल ,लायसन योग्य व्यक्तीलाच मिळत असतील ,वेगावर नियत्रण असेल तर अशा गोष्टी खूप कमी होतील.

लेखक : राम ढेकणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button