PlacesTravel BlogTrending

पुरंदर किल्ल्याविषयी माहिती ( nformation of fort Purandar )

नमस्कार मित्रांनो मी मराठी मध्ये तुमचे स्वागत,

महाराष्ट्राचा इतिहास हा रक्तरंजित घटनांनी लिहिला गेलेला आहे आणि याची साक्ष म्हणजे महाराष्ट्रातील असंख्य गिरीदुर्ग होय. मित्रांनो छत्रपती शिवरायांनी जनतेचे कल्याणकारी राज्य अर्थात स्वराज्य स्थापन केलं ते ह्या किल्ल्यांच्या जीवावरच. किल्ले म्हणजे स्वराज्याचा आत्मा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आजच्या भागामध्ये आपण अशाच एका अभेद्य किल्ल्यांपैकी एक असणाऱ्या पुरंदर या किल्ल्याविषयी माहिती बघुयात…

हे पण वाचा

Rajmachi Fort Trek

पुरंदर किल्ल्याविषयी प्राथमिक माहिती ( Primary information of fort Purandar )

 पुरंदर हा किल्ला बाराशे वर्षांपूर्वीचा किल्ला असून, हा किल्ला पुण्यनगरीतील सासवड जवळ आहे. सह्याद्रीच्या भुलेश्वर या डोंगररांगांमध्ये असलेला पुरंदर आणि सिंहगड हे आसपासचेच किल्ले होय. पुरंदर हा किल्ला स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थळ आहे, या दृष्टीने पुरंदराला एक ऐतिहासिक महत्त्व लाभलेले आहे. मिर्झाराजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या स्वराज्य कारकिर्दीतील ऐतिहासिक अशा पुरंदरच्या तहाचा देखील हा किल्ला साक्षीदार आहे.

Raigad Fort Information In Marathi : रायगड किल्ला रायगड महाराष्ट्र प्रवास माहिती आणि मुख्य आकर्षणे

या गडाचे वैशिष्ट्य म्हणजे येथून सिंहगड, राजगड आणि विचित्रगड इत्यादी किल्ले बघावयास मिळतात. कारण हे सर्वच किल्ले सह्याद्रीच्या एकाच डोंगर रांगेमध्ये असून, असे म्हटले जाते की हा किल्ला ज्या डोंगर रांगेवर आहे ती डोंगर रांग ज्यावेळी भगवान हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन चालले होते, तेव्हा त्या डोंगराचा काही भाग पडून या डोंगररांगांची निर्मिती झाली आहे.

प्रबळगड किल्ल्याची माहिती

या किल्ल्याचे उगम 1350 मध्ये आढळते. या किल्ल्याची निर्मिती यादवांच्या काळामध्ये झालेली असून, हा किल्ला जवळपास चौदाशे फूट उंचीचा आहे. तर याची समुद्रसपाटीपासूनची उंची तब्बल 4472 फूट आहे. पुण्यापासून अवघ्या 45 किलोमीटरवर असणारा हा किल्ला कात्रज चा घाट ओलांडून पुढे गेले की दिवा घाटाच्या पुढे बघावयास मिळतो.

मुख्यत्वे करून हा किल्ला दोन भागांमध्ये विभागण्यात आलेला आहे. यामधील खालच्या बाजूला माची म्हणत. याच्या उत्तर दिशेच्या बाजूला छावणी आणि दवाखाना आहे. तसेच याच्या वरील बाजूस बालेकिल्ला म्हणतात. या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी किल्ले दरवाजा नावाचा एक महाकाय दरवाजा आहे.

पुरंदर किल्ल्याचा इतिहास ( History of fort Purandar )

यादवांच्याद्वारे १३५० मध्ये बांधल्या गेलेल्या या किल्ल्याला भगवान परशुराम यांच्या नावाने पुरंदर हे नाव देण्यात आले होते. त्यानंतर पर्शियन राज्याने यादवांकडून हा किल्ला जिंकून घेतला आणि त्याची पुनर्बांधणी केली. इसवीसन 1646 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. पुढे जाऊन मिर्झाराजे जयसिंग या मोगल सरदाराने दिलेर खान याच्या मदतीने 1665 मध्ये या किल्ल्यावर चढाई केली, आणि हा किल्ला स्वराज्यातून औरंगजेबाकडे गेला. तत्कालीन किल्लेदार मुरारबाजी देशपांडे यांना या लढाईमध्ये वीरमरण प्राप्त झाले. यावेळी छत्रपती शिवरायांनी पुरंदरचा तह केला होता, या तहान्वये शिवरायांनी औरंगजेबास 4 लाख पौंड दिले होते.

त्याच्यानंतर अवघ्या पाचच वर्षात छत्रपती शिवरायांनी पुन्हा या किल्ल्यावर स्वारी करून 1670 मध्ये हा किल्ला स्वराज्यात आणला. मात्र इंग्रज राजवटीत सन 1776 मध्ये इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये झालेल्या युद्धानुसार मराठ्यांनी इंग्रजांसोबत तह केला, आणि 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

पुरंदर किल्ल्यावरील महत्त्वाची प्रेक्षणीय स्थळे ( Important view spots on fort Purandar )

मित्रांनो पुरंदर या किल्ल्यावर अनेक विविध प्रेक्षणीय स्थळे आहेत. ज्यामध्ये पुरंदरेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर, बिन दरवाजा, खंडकडा, वीर मुरारबाजी देशपांडे यांचा पुतळा, आणि पद्मावती तळे इत्यादी ठिकाणे महत्त्वपूर्ण आहेत.

पुरंदरेश्वर हे पुरंदर किल्ल्यावरील महादेवाचे मंदिर असून यामध्ये इंद्रदेवाची सुमारे दीड फूट इतक्या उंचीची दगडी मूर्ती आहे. बाजीराव पेशवे थोरले यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.

रामेश्वर मंदिर हे पेशव्यांचे गडाच्या पाठीमागील बाजूस असणारे खाजगी मंदिर होते.

पुरंदरावरील खालच्या भागाला माची म्हणतात. आणि या माचीवर जाण्यासाठी असणारा एकमेव दरवाजा म्हणजे बिनी दरवाजा होय. या दरवाजाच्या आत मध्ये पहारा करण्यासाठी बनवलेल्या पहारेकरी देवड्या बघावयास मिळतात.

किल्ल्याच्या माचीवर बिनी दरवाजाच्या आत अगदीच समोर असणारे ठिकाण म्हणजे खंडकडा होय. हा कडा बिनी दरवाजाच्या समोर जरी असला तरी यावर मात्र दिल्ली दरवाजातूनच जावे लागते. कड्याजवळ एक बुरुज आहे.

 मित्रांनो वर बघितल्याप्रमाणे पुरंदरचे तत्कालीन किल्लेदार वीर मुरारबाजी देशपांडे हे होत. त्यांच्या स्मरणार्थ विनी दरवाजाच्या आत उजव्या बाजूने वीर मुरारबाजी देशपांडे यांचा पुतळा बघावयास मिळतो.

तसेच या पुतळ्यापासून जरासे पुढे गेले की पद्मावती नावाचे सुंदर तळे आपल्याला बघावयास मिळते.

या महत्त्वपूर्ण ठिकाणांसोबतच शेंद्राचा बुरुज, केदारेश्वर दरवाजा, दिल्ली दरवाजा, पुरंदर माची आणि भैरवखिंडी इत्यादी ठिकाणे देखील प्रसिद्ध आहेत.

पुरंदरावर कसे पोहोचाल ( How to reach fort Purandar )

मित्रांनो गड किल्ले फिरण्याचे प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीचे वेड असते. पुरंदर या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी अनेकविध मार्ग आहेत. पुरंदराच्या अगदी जवळचे मुख्य शहर म्हणजे पुणे आहे. आपण पुण्यापर्यंत सर्व प्रकारच्या खाजगी तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने येऊ शकतो. खाजगी वाहन असेल तर आपण थेट पुरंदर किल्ल्यावरच जाऊ शकतो. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करीत असाल तर पुण्यापर्यंत येऊन आपण टॅक्सी किंवा बस इत्यादी साधनांनी अगदी 30 किलोमीटरचा प्रवास करून पुरंदर किल्ल्याजवळ पोहोचू शकतो. पुरंदर हा किल्ला प्रेक्षकांसाठी सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत खुला असतो.

मित्रांनो वरील माहितीवरून आपल्याला पुरंदर या किल्ल्याविषयी इत्यंभूत माहिती नक्कीच मिळाली असेल. तसेच या किल्ल्याला भेट देण्याची आपली इच्छा देखील जागृत झाली असेल. आपणही आपल्या वेळेनुसार या किल्ल्याला नक्की भेट द्या, आणि आपले अनुभव आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळविण्यास विसरू नका. तसेच गडदुर्गाशी नाते जुळलेल्या आपल्या मित्र-मैत्रिणींना देखील ही माहिती शेअर करण्यास विसरू नका.

धन्यवाद…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button