PlacesTravel BlogTrending

वर्धा जिल्ह्यातील महत्वाची १० पर्यटनस्थळे top 10 tourist places in wardha district

वर्धा हा जिल्हा आपल्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर पूर्व दिशेस स्थित आहे.हा जिल्हा महाराष्ट्र राज्यातील इतर चार जिल्ह्यांनी वेढलेला आहे. top 10 tourist places in wardha district

हे पण वाचा

Rajmachi Fort Trek

जिल्ह्याच्या तीन्ही सीमेवरून आपणास वर्धा नदी वाहताना दिसुन येते.

Raigad Fort Information In Marathi : रायगड किल्ला रायगड महाराष्ट्र प्रवास माहिती आणि मुख्य आकर्षणे

वर्धा ह्या जिल्ह्यात पर्यटनस्थळ अणि पारंपरिक खुप कमी आहेत.पण येथील प्रेरणा स्थळांना भेट देण्यासाठी अनेक देशी विदेशी पर्यटक येत असतात.

वर्धा ह्या जिल्ह्याला महात्मा गांधीचां जिल्हा ह्या नावाने देखील ओळखले जाते.

आजच्या लेखात आपण वर्धा जिल्ह्यातील महत्वाची १० पर्यटनस्थळे कोणकोणती आहेत हे थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

सेवाग्राम आश्रम –

महात्मा गांधी यांचे सेवाग्राम आश्रम हे वर्धा शहरापासून सुमारे आठ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

हे आश्रम सुमारे ३०० एकर एवढ्या परिसरात विस्तारलेले आहे.येथे आपल्याला आत्मिक अणि मानसिक शांतता लाभते.महात्मा गांधी यांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटची बारा वर्ष ह्याच सेवाग्राम आश्रमात व्यतीत केली होती.

सेवाग्राम आश्रमाचे पुर्वीचे नाव सेगाव असे होते.१९४० मध्ये ह्या आश्रमाचे नाव महात्मा गांधी यांच्या सल्ल्यानुसार सेवाग्राम आश्रम असे ठेवण्यात आले होते.

ह्या आश्रमाला भेट दिल्यावर आपल्याला शांततेचा अणि परंपरेचा अनुभव प्राप्त होतो.

बोर अभयारण्य –

बोर अभयारण्य हे केंद्रीय पर्यावरण अणि वन मंत्रालयाने १ जुलै २०१४ रोजी खासकरून वाघांकरीता आरक्षित केला होता.

ज्यांना वाघ बघायचा असेल त्यांनी ह्या ठिकाणाला एकदा नक्की भेट द्यायला हवी.हे ठिकाण नागपुर अणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे.

हे अभयारण्य साधारणतः १३८ किलोमीटर इतक्या अंतरावर पसरलेले आहे.हे भारतातील ४७ वे अणि महाराष्ट्र राज्यातील सहावे वाघांसाठी आरक्षित अभयारण्य म्हणून हे ओळखले जाते.

बोर अभयारण्य मध्ये आपल्याला बंगाल टायगर,वाघ चित्ता हरिण,माकड,हरिण,जंगली डुक्कर इत्यादी प्राणी पाहावयास मिळतात.

बोर अभयारण्य वर्धा शहरापासून ५० किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

लक्ष्मीनारायण मंदिर –

लक्ष्मीनारायण मंदिर हे वर्धा जिल्ह्यातील एक पुरातन मंदिर म्हणून ओळखले जाते.लक्ष्मीनारायण मंदिर हे विष्णु अणि लक्ष्मी देवीचे आहे.

ह्या मंदिराची स्थापना हरिजन वर्गासाठी करण्यात आली होती.कारण त्याकाळी जातीभेद उच्च नीच्च ह्या भेदभावामुळे हरिजनांना मंदिरात प्रवेश देण्यात येत नव्हता.

म्हणून हे मंदिर विशेषतः हरीजनांसाठी उभारण्यात आले होते.हया मंदिरात एक ग्रंथालय देखील आहे ज्यात वेगवेगळ्या भाषेत लिहिलेल्या पुस्तकांचा संग्रह करण्यात आला आहे.

लक्ष्मीनारायण मंदिर वर्धा शहरापासून अर्धा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

गीताई मंदीर –

गीताई मंदीर हे वर्धा जिल्ह्यातील गोपडी गावातील विश्व शांती स्तुपाजवळ आहे.हे मंदिर अक्षरांचा वापर करून बांधण्यात आले आहे.हया मंदिराची वास्तू देखील अद्वितीय असल्याचे आपणास पाहावयास मिळते.

ह्या मंदिरांविषयी विशेष बाब म्हणजे ह्या मंदिरात कुठलीही मुर्ती दिसुन येत नाही.हया मंदिराच्या जवळच एक बाग आहे.

गीताई मंदीर वर्धा शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

विश्व शांती स्तुप-

विश्व शांती स्तुप-हा गीताई मंदिराच्या बाजुला आहे.संपुर्ण सफेद रंगात हा स्तुप बनवण्यात आला आहे.हा स्तुप वर्धा जिल्ह्यातील एक प्रमुख आकर्षण म्हणून ओळखला जातो.

ह्या स्तुपाच्या चहुबाजूंनी आपणास गौतम बुद्ध यांची मुर्ती ठेवलेली दिसुन येते.याचसोबत इथे एका मोठ्या बगीच्यासोबत जपानी बुद्ध मंदिर देखील आहे.

जगभरातील बनविण्यात आलेल्या अनेक शांती स्तुपांपैकी हे एक महत्त्वाचे शांती स्तुप आहे.हयाच स्तुपाजवळ एक मंदिर देखील आहे जिथे विश्वशांतीसाठी प्रार्थना केली जाते.

विश्व शांती स्तुप वर्धा शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

गिरडदर्गा –

गिरड दर्गा हे वर्धा जिल्ह्यातील एक प्रमुख धार्मिक पर्यटनस्थळ आहे.हया ठिकाणी शेख फरीद बाबा यांची एक दर्गा देखील आहे.

हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या दर्गाला भेट देण्यासाठी अनेक भाविक भक्तजण इथे येतात.

ह्या दर्गाजवळ एक तलाव देखील आहे.कित्येक पर्यटक दर्गा मध्ये दर्शन घेऊन झाल्यानंतर ह्या तलावाच्या बाजूने फेरफटका मारत असतात.वर्धा ह्या शहरापासून गिरडदर्गा हे ठिकाण ६० किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

गांधी हिल –

गांधी हिल हे वर्धा जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते.आपल्या परिवारासोबत किंवा मित्र मैत्रिणींसोबत भेट देण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

ह्या ठिकाणी असलेले सुंदर दृश्य अणि प्रसन्न असे वातावरण पाहुन मनाला मन अगदी आनंदी होऊन जाते.गांधी हिल हे पर्यटनस्थळ महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय परिसरात असलेले आपणास दिसून येते.

वर्धा शहरापासून गांधी हिल फक्त २० मिनिटांच्या अंतरावर म्हणजे चार ते पाच किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

गांधी हिल ह्या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा चरखा अणि गांधीजींच्या तीन हुशार माकडांचे शिल्प आपणास येथे पाहावयास मिळते.हे ह्या ठिकाणचे प्रमुख आकर्षण देखील आहे.

ह्या ठिकाणी आपल्याला महात्मा गांधी यांचा चष्मा अणि घडयाळ देखील पाहायला मिळते.

जे व्यक्ती सकाळी सकाळी रणिंग योगा वगैरे करतात अशा व्यक्तींसाठी हे एक आदर्श ठिकाण मानले जाते.

मगन संग्रहालय –

मगन संग्रहालय हे वर्धा जिल्ह्यातील एक महत्वाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते.हे वर्धा जिल्ह्यातील मगनवाडी ह्या ठिकाणी आहे.

हे संग्रहालय महात्मा गांधी यांनी ३० डिसेंबर १९३८ मध्ये केली होती.मगन संग्रहालय हे गांधीवादी अर्थव्यवस्थेचे तज्ञ अर्थम मायकम अणि डाॅक्टर जेसी ह्या दोघांना समर्पित करण्यात आले आहे.

मगन संग्रहालय हे गांधी उद्योग,दुग्ध व्यवसाय अणि शेतीविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी स्थापित करण्यात आले होते.वर्धा शहरापासून मगन संग्रहालय अवघ्या दीड किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

पोथरा धरण –

पोथरा धरण हे ठिकाण वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मध्ये आहे.येथील सुंदर अणि हिरव्यागार धरणाने नटलेला परिसर मनाला हवाहवासा वाटू लागतो.

पोथरा धरण परिसरात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी देखील आढळुन येतात.पोथरा धरणाच्या जलाशयाची पातळी सगळीकडे एकदम सारख्या प्रमाणात दिसुन येते.

वर्धा शहरापासून हे धरण ६० किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

विनोबा भावे आश्रम –

भुदान चळवळीचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे आचार्य विनोबा भावे यांचे आश्रम देखील वर्धा जिल्ह्यात आहे.हे आश्रम १५ ते २० किलोमीटर इतक्या अंतरावर पसरलेले आहे.हे ठिकाण निसर्गसौंदर्याने देखील नटलेले आहे.

जे व्यक्ती आपल्या रोजच्या जीवनाला कंटाळले आहेत त्यांनी एक दिवस तरी ह्या निसर्गसंपन्न वातावरणाने बहरलेल्या ठिकाणाला भेट द्यायला हवी.

हे आश्रम स्वता आचार्य विनोबा भावे यांनी स्थापित केलेले आहे.वर्धा शहरापासून हे आश्रम साधारणतः १० किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button