Places

गंगा नदी

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो नदी हा प्रत्येक जीवसृष्टीच्या जिव्हाळ्याचा विषय… नदीला पृथ्वीवरील जीवनाची माता म्हणून ओळखले जाते.

      पाऊस पडला की थेंब थेंब पाण्यापासून नदीची निर्मिती होते, यातून नदीचा सातत्य हा गुणधर्म आपण घेतला पाहिजे.

        मित्रांनो भारतात नदीला मातेचे स्थान दिले जाते. भारतामधील सर्वात पूजनीय अशी नदी म्हणजे गंगा नदी होय. सर्वजण गंगा नदीला गंगामैया म्हणूनच संबोधतात. गंगोत्रीला उगम पावून अखंड अविरत बाराही महिने वाहणारी ही नदी प्रत्येक भारतीयांसाठी श्रद्धेची गोष्ट आहे. अगदी काही लोक गंगापरिक्रमा देखील करतात. गंगेच्या पाण्याने स्नान केल्याने आपली सर्व पापे नष्ट होतात, अशी समाज मान्यता आहे. चला तर मग आजच्या भागामध्ये आपण गंगा या नदी विषयीची सविस्तर माहिती बघूया…

      खरंतर गंगा ही नदी प्रामुख्याने एक हिमनदी असून अलकनंदा आणि भगीरथी या दोन प्रवाहांपासून गंगा नदीची निर्मिती होते. यापैकी अलकनंदा ही अलकापुरीला तर भगीरथी ही गंगोत्री येथे उगम पावते.

भगीरथी नदी तब्बल 175 किलोमीटर एकटीच वाहते. त्यानंतर देवप्रयाग येथे तिला अलकनंदा येऊन मिळते. आणि तिथूनच पुढे या नदीला गंगा हे नाव पडते. मात्र सर्वसाधारणपणे गंगा या नदीचा उगम उत्तराखंड मधील गंगोत्री येथेच समजला जातो. गंगा नदीचा साधारण प्रवास सांगायचा झाल्यास गंगोत्री येथे उगम पावल्यानंतर उत्तराखंड राज्यातून वाहत पुढे ती उत्तर प्रदेश मध्ये प्रवेश करते. तिथून पुढे बिहारहून ती पश्चिम बंगालमध्ये जाते. तेथे या नदी परिक्षेत्रात सुंदरबन नावाचा नयनरम्य परिसर आढळून येतो. पुढे ती बांगलादेश या देशामध्ये प्रवेश करते.  आणि पुढे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते…

गंगा नदी विषयीची थोडक्यात माहिती Brief Information of Ganga River

1.उगम: उत्तराखंड येथील गंगोत्री येथे, भारत. 4267 मीटर उंचीवर

2.लांबी: 2525 किलोमीटर

3.प्रवास राज्य:  उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल.

4.प्रवास देश: भारत आणि बांगलादेश

5.पाणलोट क्षेत्रफळ: दहा लाख 50 हजार चौरस किलोमीटर.

गंगा नदीच्या उपनद्या Sub-Rivers of Ganga River

1. उजव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या

 गंगा नदीला उजव्या बाजूने यमुना, बनास, चंबळ, कालीसिंध, पार्वती, सिंध, बेतवा, धसान, केन, टोन, शोन आणि कोल इत्यादी उपनद्या मिळतात.

2.डाव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या

गंगा नदीला डाव्या बाजूने रामगंगा, गोमती, घागरा, राप्ती, गंडक आणि कोशी इत्यादी उपनद्या येऊन मिळतात.

गंगा नदी काठावरील महत्त्वाची शहरे Important Cities at the bank of Ganga River

       मित्रांनो गंगा नदीला भारतात धार्मिक महत्त्व आहे. गंगेच्या काठी अनेक विविध धार्मिक स्थळे वसलेली आहेत. यामध्ये हरिद्वार आणि ऋषिकेश ही दोन महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेत. सोबतच अलाहाबाद, वाराणसी, मिर्झापूर, कानपूर, गया आणि पाटणा इत्यादी महत्त्वाची शहरे देखील गंगेच्या काठी वसलेली आहेत.

         मित्रांनो प्राचीन भारतातीलही कनोज, पाटलीपुत्र, काशी, कौशांबी, कंपिल्य, प्रयाग आणि मुंबेर इत्यादी महत्त्वाची शहरे वसलेली होती.

गंगा नदीचे महत्व  Importance of Ganga River

         मित्रांनो वर पहिल्याप्रमाणेच गंगा या नदीला धार्मिक महत्त्व तर आहेच, मात्र भारतातील सर्वात लांब वाहणारी ही नदी लाखो लोकांचे जीवन समृद्ध करते. प्रामुख्याने गंगेच्या मैदानी प्रदेशामध्ये गंगा नदीच्या पाण्यावर सिंचित शेती केली जाते. गंगा नदीच्या पाण्याचा उपयोग अगदी प्राचीन काळापासूनच शेती वापरासाठी केला जात आहे. पूर्वी चौथ्या शतकाच्या दरम्यान गंगेच्या मैदानी प्रदेशात असंख्य धरण आणि कालवे निर्माण करण्यात आले. यातून कैक एकर क्षेत्रावर पिके उभी केली जातात.

         सोबतच गंगेच्या पाण्याने विद्युत निर्मिती देखील केली जाते. गंगेवर बरेच जलविद्युत प्रकल्प असून त्यांची क्षमता जवळपास दोन लाख ते अडीच लाख मेगावॅट इतकी आहे.

गंगा नदीवरील धरणे आणि सिंचन प्रकल्प Dams and Irrigation Project on Ganga River

         मित्रांनो गंगा नदीवर अगदी प्राचीन काळापासूनच अनेक धरणे बांधली गेली आहेत. त्याचा वापर सार्वजनिक रित्या पिढ्यान पिढ्या होत आलेला आहे. यातील टेहरी धरण, भीमघोडा धरण, आणि फरक्का धरण इत्यादी महत्त्वाची धरणे आहेत.

       गंगेची उपनदी भगीरथी यावर बांधलेले टेहरी धरण हे सर्वात उंचावरील धरण आहे. या धरणाचा वापर उत्तराखंडसह अनेक क्षेत्रांमध्ये सिंचन व्यवस्थेसाठी केला जातो. या धरणाद्वारे तब्बल 2 लाख 70 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. टेहरी हे धरण तब्बल 261 मीटर उंच असून जगामधील पाचव्या क्रमांकाचे सर्वात मोठे धरण आहे. सिंचन व्यवस्थेबरोबरच या धरणांमधून उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि दिल्ली या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दररोज तब्बल 2400 मेगा व्हॅट इतकी वीज पुरविली जाते. सोबतच जवळपास 102 कोटी लिटर पिण्याचे पाणी देखील पुरविले जाते.

      गंगेवरील भीमकुडा हे धरण ब्रिटिश काळात 1840 मध्ये बांधले गेले. या धरण बांधकामामागील प्रमुख उद्देश गंगा नदीचे पाणी विभाजित करून त्याला अप्परगंगा नावाच्या कालव्यामध्ये वळविणे हा होता.

‘नमामि गंगे’ योजना ‘Namami Gange’ Project

           मित्रांनो गंगा ही भारतीय जनतेसाठी मातेसमान आहे, म्हणूनच गंगेच्या स्वच्छतेसाठी अनेक स्तरावरून प्रयत्न केले गेले. मात्र जुलै 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारांनी केंद्र सरकारने ‘नमामि गंगा’ या नावाने एक देशव्यापी कार्यक्रमाची आखणी केली. याद्वारे गंगा नदी स्वच्छतेचे कार्य हाती घेण्यात आले आहे.

           या योजनेअंतर्गतच भारत सरकारने गंगाकिनारी असणारे सर्व औद्योगिक कारखाने आणि कंपन्या बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत, ज्यायोगे गंगेमध्ये सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्यावर नियंत्रण आणले जाईल.

गंगेच्या पाण्यामधील जीवसृष्टी Ecosystem of Ganga

मित्रांनो गंगा ही नदी भारतातील सर्वात लांब नदी असून, त्यामध्ये जैवविविधतेच्या बाबतीत प्रचंड विविधता आढळून येते. यातील उल्लेखनीय बाब म्हणजे गंगा नदीमध्ये डॉल्फिन आणि शार्क या माशांच्या प्रजाती देखील आढळतात. यापैकी गंगेतील डॉल्फिन आणि इरावती डॉल्फिन या दोन प्रजाती प्रमुख आहेत. मात्र अलीकडील काही कालावधीमध्ये गंगा नदी मधील ऑक्सिजनची पातळी खालावल्यामुळे गंगेतील जीवसृष्टीला धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. म्हणूनच सरकारने हाती घेतलेल्या ‘नमामि गंगे’ या गंगा स्वच्छता अभियानाला आपण सर्वांनी एक भारतीय नागरिक म्हणून हातभार लावणे गरजेचे आहे.

गंगा नदी बद्दलची काही तथ्ये Facts about Ganga River

1. गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये भारताचा तब्बल 25% भूभाग येतो.

2.गंगा नदी खोऱ्यात भारतातील 40% लोकसंख्या वास्तव्य करते.

3.गंगा या नदीला हुगळी नावाची एकमेव वितरिका असून तिला दामोदर आणि मयुरक्षी या नावाच्या दोन उपनद्या आहेत. या हुबळी नदीकाठी कोलकत्ता हे महत्त्वपूर्ण शहर आहे.

मित्रांनो गंगा नदी या विषयावरील ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंट च्या माध्यमातून नक्की कळवा  तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींना देखील ही माहिती अवश्य शेअर करा.

 धन्यवाद…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button