Places

यमुना नदी

प्रस्तावना:

नमस्कार मित्रांनो प्राचीन काळी जेव्हा लोकवस्ती उदयास आली तेव्हा ती नद्यांच्या काठीच वसलेली असे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे पहावयास मिळते .

मित्रांनो जमुना किंवा यमुना उत्तर भारतामधील सर्वात महत्त्वाची नदी असून ही नदी मुख्यत्वे करून उत्तराखंड व उत्तर प्रदेश या राज्यांमधून वाहते.

गंगा नदीनंतर भारतातील सर्वात पवित्र नद्यांपैकी असणारी नदी म्हणजेच यमुना नदी होय .

ही नदी दिल्लीची जणू जीवनवाहिनीच समजली जाते .तर मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण यमुना नदीबद्दल सविस्तर माहिती पाहूयात.

यमुना नदीचा उगम Origin of Yamuna River

यमुनेचा उगम हा हिमालय स्थित यमुनोत्री या ठिकाणी होतो .यमुना ही नदी गंगेची सर्वात मोठी उपनदी आहे. बंदरपुच्छ रेंजच्या हिमालयामधील बर्फाच्छादित पर्वतशृंखलांमध्ये उत्तर -पश्चिम दिशेला 6200 मीटर अंतरावर  उंच कलिंग पर्वत स्थित आहे.

येथून यमुनेचा खरा उगम आहे .यमुना या नदीला कालिंदी किंवा कालिंदज या नावाने देखील ओळखले जाते.

यमुना ही नदी गंगेला समांतर वाहून प्रयागजवळ गंगेला मिळते .

यमुना नदी विषयी काही महत्त्वाचे मुद्दे  Important Facts of Yamuna River

 यमुना या नदीला जमुना या नावाने देखील ओळखले जाते .यमुना नदीची लांबी ही 1736 किलोमीटर इतकी असून यमुना नदीचे बेसिन क्षेत्र हे 366.223 स्क्वेअर किलोमीटर इतके आहे .

यमुना नदीची खोली ही तीन मीटर असून यमुना नदीच्या काठावर यमुना नगर ,आग्रा ,प्रयागराज, मथुरा ,नोएडा, काल्पी, हमीरपुर, इटावा ,बागपत व फिरोजाबाद इत्यादी शहरे वसलेली आहेत .

यमुना नदीवर जुना नैनी पूल स्थित असून. ज्या ठिकाणी गंगेच्या मुखाजवळ यमुना ही गंगेस मिळते त्या ठिकाणाला त्रिवेणी संगम म्हणून संबोधले जाते .जेथे यमुनेचा उगम होतो ते ठिकाण म्हणजे यमुनोत्री .धार्मिकदृष्ट्या हे ठिकाण खूप पवित्र मानले जाते. यमुनोत्री या ठिकाणाचे दर्शन घेतल्याशिवाय यात्रेकरूंना यात्रा सफल झाल्याचे अभिप्रेत होत नाही. उगमा पासून जेव्हा यमुना नदी ही खाली सरकते तेव्हाही डोंगरांच्या शिखरांमधून झपाट्याने खाली येते.

यमुना नदीचे पावित्र्य Sanctity of Yamuna River

 यमुना नदी ही गंगेला प्रयागराज येथे येऊन मिळते. या ठिकाणाला त्रिवेणी संगम म्हणून ओळखले जाते. हिंदू धर्मामध्ये या त्रिवेणी संगमाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. यमुना हे नाव मूळ संस्कृत भाषिक असून ज्याचा हिंदी भाषेतील अर्थ जुळे असा होतो. यमुना या पवित्र नदीचा उल्लेख आपल्या पौराणिक ऋग्वेद व अथर्ववेद या प्राचीन ग्रंथांमध्ये आपल्याला पहावयास मिळतो .कृष्णदेवतेच्या जन्माचा संबंध यमुना नदीशी असल्याचा पुराणामध्ये उल्लेख आहे .

यमुना नदी ही गंगा नदीच्या खोऱ्यामधील द्वितीय क्रमांकाची सर्वात मोठी उपनदी आहे .त्यामुळे सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या नद्यांमध्ये यमुनेने देखील आपले स्थान निर्माण केलेले आहे.

यमुना नदीचा प्रवास Journey of Yamuna River

यमुनेच्या प्रवासाबद्दल बोलायचे झाले तर सुमारे 855 किलोमीटर इतका प्रवास करून यमुना नदी ही अलाहाबाद येथे गंगा नदी समवेत एकत्रित होते .हिंदू धर्मियांच्या मते दोन पवित्र नद्यांचा संगम होणे म्हणजे दैवाचे अस्तित्व तेथे असणे असेच होते .ज्या ठिकाणी या दोन नद्यांचा संगम होतो ते ठिकाण म्हणजे प्रयागराज जे दर बारा वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्याचे उत्सव ठिकाण आहे. त्या कुंभमेळ्याकडे लाखो अनुयायी आकर्षित होत असतात. यमुना नदी ही दिल्लीतून प्रवास करून पुढे आग्र्यातही वाहत जाते. मथुरे जवळ यमुना नदी आग्रा कडे वळते व तेथून फिरोजाबाद, इटावा, व आग्रा मधून प्रवास करून संपूर्ण उत्तर प्रदेशची भूमी व्यापते.इटावा पुढे आल्यानंतर यमुनेला दक्षिणेकडील उपनद्या येऊन मिळतात.

 यातील सर्वात महत्त्वाच्या उपनद्या म्हणजे चंबळ, बेतवा, केन, सिंध ,इत्यादी…

यमुना नदीचे प्रदूषण Pollution in Yamuna River

उत्तराखंड मधील हिमोक्षेत्रापासून यमुनेचा उगम होतो. उत्तराखंड मधून वाहत जाऊन ही नदी दिल्ली, हरियाणा, व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये वाहते. भारत सरकारच्या सर्वेक्षण अहवालानुसार उगमापासून यमुना नदीचे पाणी हे खूपच नितळ व स्वच्छ आहे. पण जेव्हा ती दिल्लीमध्ये प्रवेश करते तेथूनच तिच्या प्रदूषणास सुरुवात होते. भारत सरकारने 1984 मध्ये यमुनेच्या स्वच्छतेचा जो प्रकल्प हाती घेतला तो काही राजकीय कारणास्तव अयशस्वी ठरलेला पहावयास मिळतो. मुख्यत्वे करून दिल्लीमधील दिल्ली एनसीआर या क्षेत्रामध्ये यमुना ही सर्वाधिक प्रदूषित होते. याचे मुख्य कारण म्हणजे औद्योगीकरणातून निघणारा कचरा होय .औद्योगिक कचरा व औद्योगिक वसाहतीतून निघणारे गरम व प्रदूषित पाणी हे यमुनेमध्ये सोडले जाते ज्यामुळे यमुनेच्या पाण्याचे तापमान वाढून पाण्यातील जीवसृष्टीला खूप हानी होते. त्यामुळे भारत सरकारने यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी कठोर पावले उचलणे खूपच गरजेचे आहे .

तर मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण यमुना नदी बद्दल जी काही माहिती पाहिली ती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. तसेच आपल्या आप्तेष्टांनाही ही बहुमूल्य माहिती नक्की शेअर करा.

धन्यवाद!!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button